पिंपरीतील आंबेडकर चौकाजवळील रॉक्सी हॉटेलसमोर एका रिक्षाचालकावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेराज हकिम शेख (वय २६, रा. पिंपरी) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन आरोपी ऑटो रिक्षातून आंबेडकर चौक परिसरात आले.

पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपींनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी २८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिंपरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.