
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्र
एआय चित्रमुख्य निवडणूक आयुक्तांशी संबंधित निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेने रविवारी (२७ सप्टेंबर) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ निषेध आंदोलन जाहीर केले आहे.
एआय चित्रप्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) आणि पोलिस मित्रांनी आकुर्डी, प्राधिकरण, रावेत आणि पूर्णानगर भागात गणेश विसर्जनात प्रशासनाला मदत करत गणेश तलाव, वाल्हेकरवाडी आणि पूर्णानगर घाटांवरून सुमारे दोन टन निर्माल्य संकलित केले.
एआय चित्रनोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’ हा रोजगार मेळावा मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी नवी सांगवीतील दि न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होणार आहे. आमदार शंकर जगताप यांनी तरुणांना नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
एआय चित्रपिंपरीतील वैभवनगर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॉलीवरील सजावटीचा मागचा भाग कोसळला. सजावट हलत असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी वाहने थांबवून नागरिकांना दूर केल्याने मोठी दुर्घटना टळली.
एआय चित्रथेरगावातील वनदेव आनंदवन मित्र मंडळाने गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाहाचा पौराणिक जिवंत देखावा शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सादर करण्याचे नियोजन केले होते.
एआय चित्रचिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी निगडीतील ज्ञान प्रबोधिनी केंद्रातील गणेशोत्सवात सहभागी होऊन आरती केली. संस्थेत गेली ४६ वर्षे जपली जात असलेली गणेश प्रतिष्ठापनेची परंपरा प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
एआय चित्रदोन दिवसांपासून बेपत्ता असलेले पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी विजय कोळी यांचा मृतदेह शनिवारी सकाळी निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर बस डेपो परिसरात आढळला. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एआय चित्रभोसरी परिसरातील गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक गुरुवारी ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शांततेत पार पडली. वीर हनुमान मित्र मंडळाने पहिली, तर विघ्नहर्ता मित्र मंडळाने शेवटची मिरवणूक काढली.
एआय चित्रमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थी २ ऑक्टोबरपासून पुण्यातील नवी पेठेत एस. एम. जोशी पुलाजवळ बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. पोलिसांनी या तारखेला परवानगी देण्यास सहमती दर्शवली आहे.
एआय चित्रचिंचवडमधील बिजलीनगर परिसरात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगारावर चिंचवड पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून रोख रक्कम आणि मोटारसायकल जप्त केली आहे.
एआय चित्रचिंचवडमधील आनंदनगर येथे रुनवाल गेटसमोरील अंतर्गत रस्त्यावर गणेशोत्सवादरम्यान बंदी असतानाही उच्च क्षमतेचा डीजे व डॉल्बी वाजवल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस दिली आहे.
एआय चित्रमोशी कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प जुलैतील दुर्घटनेनंतर बंद असल्याने पिंपरी-चिंचवडमधील कचऱ्याच्या प्रक्रियेची साखळी विस्कळीत झाली असून त्याचा सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता महापालिकेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
एआय चित्रतळवडेतील वडमुखवाडी परिसरात हायवा टेम्पोने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी विशाल चौगुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एआय चित्रइन्स्टाग्रामवर ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत काळेवाडीतील ३४ वर्षीय महिलेकडून ८ लाख १४ हजार रुपये उकळल्याची तक्रार काळेवाडी पोलिसांत दाखल झाली आहे.
एआय चित्रमाथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणारे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र मजदूर संघटनेने चिंचवडमधील केएसबी चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
एआय चित्र