राजयोग परिसरातील प्रलंबित नागरी समस्यांबाबत काल स्थानिक नगरसेविका सौ. ऐश्वर्या तरस यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक पार पडली.
बैठकीमध्ये कचरा संकलन केंद्राची समस्या, झोपडपट्टीविषयक प्रश्न आणि परिसरातील स्पीड ब्रेकरची गरज यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान सौ. ऐश्वर्या तरस यांनी यापैकी बहुतांश प्रश्न पुढील काही आठवड्यांत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
तसेच ज्या समस्यांसाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांची कार्यवाही आवश्यक आहे, त्या विषयांवर संबंधित PCMC अधिकारी आणि विभागांकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आता या आश्वासनांनंतर प्रत्यक्ष कामाला किती वेगाने सुरुवात होते आणि नागरिकांच्या समस्या कितपत मार्गी लागतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष आहे.