विसर्जनाच्या काळात भाविकांना मदत करतानाच स्वयंसेवकांनी पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश देत घाटांवरील निर्माल्य संकलनाचे काम केले.
समितीचे प्रमुख एसपीओ विशाल शेवाळे यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलनाची जबाबदारी सांभाळली.
पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आणि वाहतूक उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी यंदा स्वयंसेवकांना विसर्जन बंदोबस्ताबाबत विशेष मार्गदर्शन केले होते. स्थानिक पोलिस निरीक्षकांनीही त्यांना सूचना दिल्या.
गेल्या २४ वर्षांपासून समितीचे स्वयंसेवक दरवर्षी भाविकांना आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले. प्राधिकरणातील गणेश तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी यंदा स्वयंसेवकांनी विशेष पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.











