विविध विभागांत नियमित प्रशासकीय कामकाज सुरू असले तरी नवे निर्णय, विकासकामे आणि काही महत्त्वाच्या प्रक्रियांवर आचारसंहितेचा परिणाम होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कामाचा मोठा ताण होता; आता महिनाभर तो काहीसा कमी झाल्याने कार्यालयांतील वातावरण शांत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर प्रलंबित प्रस्ताव आणि कामे एकाच वेळी मार्गी लावावी लागतील, त्यामुळे पुढील काळात कामाचा ताण वाढेल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आचारसंहितेचा कालावधी संपेपर्यंत महापालिकेत नव्या घोषणांऐवजी नियमित कामकाजावरच भर राहणार आहे.










