पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका घरातून गौरी-गणपती उत्सवाच्या काळात एकविरा देवीच्या मूर्तीवरील सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडंट चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, घरातील घरकाम करणारी महिला गजरा सटप्पा कांबळे (वय ४५) हिच्यावर संशय बळावला.

पोलिसांनी गजरा कांबळेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेले ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडंट जप्त करण्यात आले, ज्याची किंमत २,८४,८४७ रुपये आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपनिरीक्षक सारंग आव्हाड, तसेच पोलीस अंमलदार बसवराज तेली, श्वेता खेडकर, प्रवीण मोरे, प्रकाश पारखे, किशोर गिरीगोसावी, सचिन कचोले, प्रसाद जांगिलवाड, दिलीप राठोड आणि सागर कोळी यांच्या पथकाने केला. आरोपी गजरा कांबळेला न्यायालयात हजर केले असता, तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास शिरगाव परंदवडी पोलीस करत आहेत.