पिंपरी, नेहरू नगर येथे एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर कुंडलिक सरकाटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. संतोषी माता चौक आणि झिरो बॉईज चौक यांच्या दरम्यान, पदपथावर प्रभाकर सरकाटे यांच्या डोक्यात सिमेंटच्या फरशीने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे न्यूज पीसीएमसीने दिलेल्या माहितीनुसार समजते.
या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत रोहित उर्फ भाऊ जांग्या प्रकाश धोत्रे, अर्णव उर्फ आरव लोकेश उर्फ आरव्या आणि प्रणित प्रशांत निकाळजे या तीन संशयितांना अटक केली आहे. मात्र, सचिन राम साबळे नावाचा एक संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मृताचा मुलगा, २४ वर्षीय गणेश प्रभाकर सरकाटे याने या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नेहरू नगर परिसरात खळबळ उडाली आहे.














