राजमाता जिजाऊ नगरमधील क्रांती चौक येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाचा कार्यक्रम घेतला.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि करिअरच्या संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक तुषार सहाने, डॉ. सुहास कांबळे, नम्रता लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरातील सोसायट्यांच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद अहिरे, अध्यक्ष युवराज शेळके आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. राहुल शिनलकर यांनी सूत्रसंचालन केले.