विद्यार्थ्यांना प्रशासकीय आणि शासन व्यवस्थेची जवळून ओळख व्हावी आणि त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे मिळावीत, या उद्देशाने पुणे दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा संवाद कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्न विचारले. सरकारी दाखले मिळण्यास लागणारा वेळ कमी करावा आणि रेशन कार्ड डिजिटल करून ते मोबाइलवर उपलब्ध करावे, अशा सूचना विद्यार्थ्यांनी केल्या.
बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. शासनाच्या आयटी विभागामार्फत डेटा सेंटर आणि डिजिटल प्रणालीचा वापर वाढवण्याचे काम सुरू असून रेशन कार्ड मोबाइलवर देण्याच्या सूचनेवर आधीच काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, आमदार विक्रांत पाटील, उपमहापौर शर्मिला बाबर, डॉ. प्रिया गोरखे, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.














