गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांवर मोठी गर्दी होते. या मार्गांवर कोंडी होऊ नये आणि नागरिकांची ये-जा सुरळीत राहावी, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता जड-अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला.
भोसरीत दिघी रोड (गंगोत्री पार्क ते संविधान चौक), आळंदी रोड, लांडेवाडी चौक ते चांदणी चौक आणि महामार्गावरील दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड यांचा समावेश होता. चिंचवडमध्ये चिंचवड स्टेशन ते थेरगाव घाट, लिंक रोड परिसर आणि मोरया गोसावी मंदिर ते मोरया घाट हे मार्ग निर्बंधाखाली होते.
पिंपरीत शगुन चौक, साई चौक, रिव्हर रोड, डिलक्स चौक ते काळेवाडी पूल, पिंपरी चौक ते पिंपरी पूल, तसेच संत तुकारामनगर, नेहरूनगर आणि मोरवाडी परिसरातील मार्गांवर बंदी होती. वाकडमधील दत्त मंदिर रोडकडे जाणारे मार्ग आणि सुस ब्रिजकडील रस्त्यांचाही यात समावेश होता.
या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले होते. गणेशोत्सव काळातील वाहतुकीशी संबंधित अद्ययावत माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली होती.




