गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शहरात मोठ्या संख्येने विसर्जन होणार असल्याने पोलिस आयुक्तालयाने मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट आणि गर्दीच्या ठिकाणांवर बंदोबस्ताचे नियोजन केले.
बंदोबस्तासाठी दोन अपर पोलिस आयुक्त, आठ उपायुक्त, सोळा सहायक पोलिस आयुक्त, ७४ पोलिस निरीक्षक, २९० सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, २,७८० पोलिस अंमलदार, सहा आरसीपी पथके, ६०२ होमगार्ड, एमआरपीएफच्या दोन प्लाटून आणि १६६ वॉर्डन नियुक्त करण्यात आले.
विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि नागरिकांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात आली.
गणेशोत्सव शांततेत आणि मंगलमय वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे आयुक्तालयाने सांगितले.










