थेरगाव, पिंपरी-चिंचवड: ४ ऑक्टोबर, २०२६ रोजी इन्दिरा विद्यापीठाच्या (पुणे) स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. ही भेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग होती.

या भेटीदरम्यान, अभिषेक बारणे यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, नागरी प्रशासन, नागरिकांचे प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आणि मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. मतदार यादीतील विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींची भूमिका यावरही चर्चा झाली.

आरोग्य, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा संकलन, मालमत्ता कर आणि विविध कल्याणकारी योजना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही यावेळी संवाद साधण्यात आला. डॉ. पूनम कवळे यांनी या भेटीचे आयोजन केले होते, अशी माहिती न्यूज पीसीएमसीने दिली.