गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात नागरिकांना धार्मिक परंपरा आणि पौराणिक कथानकाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने हा देखावा आयोजित केल्याचे मंडळाने सांगितले.

थेरगावातील आनंदवन सोसायटीजवळील कै. मोरू महादू बारणे क्रीडांगणावर शुक्रवारी सायंकाळी सहा ते मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा होणार होता. काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाहाची कथा जिवंत देखाव्याच्या रूपात सादर करण्यात येणार होती.

या सोहळ्याला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री स्नेहलता माघाडे, प्रियांका जाधव, पौर्णिमा डे आणि उर्मिला कानेटकर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले होते.

प्रभागातील नागरिकांनी सहकुटुंब सहभागी होऊन या देखाव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाचे संस्थापक अभिषेक बारणे यांनी केले होते.