या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून नोकरीच्या उपलब्ध जागा आणि करिअर मार्गदर्शनाची माहिती एकाच ठिकाणी दिली जाणार आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इच्छुकांनी आयोजकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर किंवा ऑनलाइन अर्जाद्वारे आधी नावनोंदणी करावी आणि मेळाव्याला येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरातील सर्व पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जगताप यांनी केले.






