स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. याच बैठकीत रिक्त असलेल्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शहर अभियंता मनोज सेठिया यांची निवड करण्यात आली.
माजी शहर अभियंता मकरंद निकम यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, संचालक प्रदीप भार्गव आणि यशवंत भावे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या नियुक्तीमुळे शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.











