रहाटणी, पुणे येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भालेराव यांनी केले. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप यांनी प्रतिमेचे पूजन केले. राहुल मित्र मंडळचे अध्यक्ष शांताराम भालेराव, नवयुग वितरकचे विवेक छेडा, मिलिंद निसर्गगंध आणि विद्या भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निशा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना शांती, समता, न्याय, मानवता, अहिंसा, स्वातंत्र्य, करुणा, बंधुता आणि समानतेचा संदेश देऊन ही मानवी मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले. भगवान बुद्धांनी दिलेला अहिंसा, स्वातंत्र्य, करुणा, बंधुत्व आणि समानतेचा संदेश विद्यार्थ्यांना चांगल्या मूल्यांची शिकवण देण्यासाठी पोहोचवण्यात आला.






