पोलिसांच्या माहितीनुसार, न्यू बीआरटी रोडवरून रिक्षा जात असताना मागून भरधाव आलेल्या बुलेटने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की रिक्षा रस्त्यावर उलटली.
या अपघातात रिक्षाचालक अनिल तांबे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रिक्षाचेही मोठे नुकसान झाले.
बाणेर येथे राहणारा २० वर्षीय बुलेटचालक भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता, असा पोलिसांचा आरोप आहे. याप्रकरणी एका ४० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
या अपघाताचा पुढील तपास पोलिस करत आहेत.






