एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा, पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. २ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होईल.

आंदोलनाच्या परवानगीसंदर्भात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर २ ऑक्टोबरला आंदोलनास परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दाखवली. विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

रोहित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले. गरज पडल्यास राहुल गांधी पाठिंबा देण्यासाठी पुण्यात येऊ शकतात, असे कदम यांनी सांगितले.