पोलिसांच्या माहितीनुसार, एका जुन्या वादावर तोडगा काढण्यासाठी सहा जण रेल विहार सोसायटीजवळ एकत्र आले होते. चर्चेदरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.

त्यानंतर त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घातला आणि एकमेकांची गचांडी पकडून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकारामुळे परिसरातील शांततेचा भंग झाला. माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत त्यांना नोटीस बजावली.

पोलिस शिपायाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.