तक्रारीनुसार, संशयिताने इन्स्टाग्राम खात्यावरून महिलेशी संपर्क साधून ओळख वाढवली. आपल्याकडे भरपूर पैसा असल्याचे भासवत आणि लग्नाचे आश्वासन देत त्याने तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर भावनिक बोलून आणि वेगवेगळी कारणे सांगून त्याने पैशांची मागणी सुरू केली. त्यावर विश्वास ठेवून महिलेने ऑनलाइन माध्यमातून टप्प्याटप्प्याने एकूण ८ लाख १४ हजार रुपये पाठवले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने काळेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संबंधित खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास सावध राहावे. अशी फसवणूक झाल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तातडीने तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून नेहमी केले जाते.






