उद्योजक संदीप काटे यांनी मंडळाच्या वतीने जगताप यांना आरतीसाठी निमंत्रित केले होते. आरतीनंतर माध्यमांशी बोलताना जगताप यांनी मंडळाच्या कामाचा आढावा घेतला.
पिंपळे सौदागर गाव आज जागतिक नकाशावर पोहोचले असले तरी परिसराची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपण्याचे काम मंडळाने सातत्याने केले आहे, असे जगताप म्हणाले.
मंडळाकडून गणेशोत्सवासह वर्षभर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि दिवाळीसारखे कार्यक्रम घेतले जातात, असे सांगत त्यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, निलेश काटे, धीरज काटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.














