आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रशिक्षित अग्निशमन जवान, आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण ४१ कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्यासोबत मूर्ती संकलन केंद्रे आणि निर्माल्य संकलनाची सुविधाही उपलब्ध आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दहा दिवसांत संकलित किंवा विसर्जित झालेल्या ४९ हजार ८०३ मूर्तींपैकी १० हजार १७० मूर्ती पर्यावरणपूरक, तर ३९ हजार ६३३ मूर्ती पीओपीच्या होत्या, अशी माहिती महापालिकेने दिली.
नागरिकांनी कृत्रिम तलावांचा वापर करावा, निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता संकलन केंद्रांवर जमा करावे आणि विसर्जनावेळी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.










