गणरायाच्या आगमनानिमित्त क्रांती क्रीडा मंडळाने मंडप परिसर असंख्य रंगीबेरंगी फुलांनी सजवला आहे. फुलांच्या या आरासीला पूरक अशी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसराला उत्सवी रूप आले आहे.
पिंपळे सौदागर परिसरातील गणेशोत्सवात ही सजावट प्रमुख आकर्षण ठरत असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सजावटीचा आनंद घेता यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केल्याचे मंडळाने सांगितले.
परिसरातील नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घ्यावे आणि फुलांची आरास पाहावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.









