भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्यात उमाकांत लिंगाडे, श्रीधर महाले आणि प्रज्वल खुटाळ यांच्यासह शहराच्या विविध भागांतील अनेक युवकांनी जाहीर प्रवेश केला. शहर जिल्हा अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य, जनसेवा आणि युवकांशी संबंधित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शहरातील युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव तथा प्रभारी अजित कुलथे, सरचिटणीस राहुल खाडे, सुमित घाटे, सम्यक साबळे यांच्यासह शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







