पक्षसंघटना बळकट करण्यासाठी जून २०२६ मध्ये शहरातील इच्छुक कार्यकर्त्यांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या होत्या. संघटनात्मक क्षमता, पक्षातील सक्रियता, सामाजिक कामातील योगदान आणि पक्षाच्या कार्यक्रमांतील सहभाग या निकषांवर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केवळ पदाची इच्छा असलेल्यांऐवजी प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या आणि संघटना वाढवण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न असल्याचे शहराध्यक्ष चेतन पवार यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळातही विविध प्रभागांत कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
सोमवारी (२१ सप्टेंबर) ही यादी मुंबईत खासदार संजय राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच शहर कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
नव्या कार्यकारिणीत कोणाला स्थान मिळते, याकडे पक्षातील कार्यकर्त्यांसह शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







