पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने पाठवलेल्या पत्रकातून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. भोसरी विधानसभा संघटकपदी अमोल भालेकर, चिंचवड विधानसभा संघटकपदी सिद्धिक शेख आणि चिंचवड विधानसभा समन्वयकपदी श्रीमंत गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील संघटनात्मक कामकाजासाठी दिलीप सावंत, दिलीप दंडवते, नितीन घोलप, गणेश आहेर, पार्थ गुरव, किरण दळवी, पांडुरंग पाटील, लक्ष्मण तपकीर, विकास एकशिंगे, गणेश पाडुळे, सतीश मरळ, सुमित निकाळजे, रावसाहेब डोंगरे आणि नितीन बोंडे यांना उपशहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शहरप्रमुख चेतन पवार यांनी सोमवारी (२१ सप्टेंबर) मुंबईत खासदार संजय राऊत यांच्याकडे नव्या कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांची यादी सादर केली होती. जूनमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

संघटनात्मक क्षमता, पक्षातील सक्रियता आणि सामाजिक कामाचा विचार करून निवड केल्याचे पक्षाने सांगितले. यादी सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नियुक्त्या जाहीर झाल्याने शहरातील संघटनात्मक बांधणीला वेग आल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.