अनधिकृत आणि लोंबकळणाऱ्या केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि शहराच्या सौंदर्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आयुक्तांनी पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीत सांगितले.
येत्या वर्षभरात शहरातील केबल्स भूमिगत करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले असून त्यासाठी सुमारे ६१० किलोमीटर पाईप्सचे जाळे उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केबल व्यवस्थेसाठी महापालिका एक प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करत आहे. त्यात परवानगी प्रक्रिया, भूमिगत केबल्सचा वापर आणि अनधिकृत तसेच वापरात नसलेल्या केबल्स हटवण्याबाबतचे नियमन असेल.
बैठकीला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विविध समित्यांचे सभापती, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व तृप्ती सांडभोर, अभियंते आणि केबल ऑपरेटर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.











