वायसीएम रुग्णालय परिसरातील एका गणेश मंडळाने कोणतीही शासकीय परवानगी न घेता शांतता क्षेत्रात ढोल, ताशा आणि बँड वाजवत विसर्जन मिरवणूक काढल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
मोठ्या आवाजामुळे रुग्णालयातील रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असतानाही वाद्ये वाजवण्यात आली, तसेच १६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
संत तुकारामनगर पोलिस ठाण्यातील हवालदाराच्या फिर्यादीवरून मंडळाच्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि बँड पथकाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश आटवे आणि अजित दिवटे करत आहेत.














