अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी मोठा संघर्ष उभारला, असे इरफान सय्यद यांनी सांगितले. कामगारांच्या श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा आणि त्यांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिल्याचे ते म्हणाले.
त्यांनी उभारलेली कामगार चळवळ आजही कष्टकरी कामगारांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचे जतन करणे आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवणे हीच खरी आदरांजली ठरेल, असे सय्यद यांनी सांगितले.
माथाडी कामगारांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि कामगार कल्याणाच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. अण्णासाहेबांची चळवळ ही संपूर्ण कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हाध्यक्ष हनुमंत तरडे, जिल्हा संघटक प्रदीप धामणकर यांच्यासह पदाधिकारी, विविध माथाडी टोळ्यांचे मुकादम आणि कामगार उपस्थित होते.









