नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरसेविका डॉ. कुंदा भिसे आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी शौचालयाची पाहणी केली. दोन वर्षांपासून शौचालय बंद असल्याबाबत त्यांनी देखभालीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराकडे विचारणा केली.

शौचालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून सार्वजनिक सुविधेची दुरवस्था झाल्याचे पाहणीत दिसून आले.

शौचालयाच्या इमारतीतील गाळ्यांचा अनधिकृत वापर होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. ई-सेवा केंद्रासाठी राखीव असलेल्या गाळ्यात पंक्चर काढण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.

भाजपचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे तसेच नगरसेविका अनिता काटे यांच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असे आश्वासन डॉ. भिसे यांनी नागरिकांना दिले.