भोसरीतील विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. पारंपरिक वाद्यांसोबत काही मंडळांनी डीजेचाही वापर केला, तरी मिरवणूक भक्तिमय आणि शांत वातावरणात पार पडली.

महापालिकेच्या वतीने बापूजी बुवा चौकात उभारलेल्या स्वागत कक्षात अतुल पाटील, किरण गायकवाड आणि किरण अंदुरे यांच्या हस्ते मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.

मिरवणुकीत वीर हनुमान मित्र मंडळ, लोंढे तालीम मित्र मंडळ, श्री कानिफनाथ मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ, फुगे माने तालीम मंडळ, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, लांडगे लिंबाची तालीम मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ, नाथसाहेब प्रतिष्ठान, महात्मा फुले मित्र मंडळ, भोलेश्वर मित्र मंडळ यांच्यासह अनेक मंडळे सहभागी झाली.

महापालिका, पोलिस, वाहतूक शाखा, सीआरपीएफ जवान आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मिरवणूक सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले.