पिंपळे सौदागरमधील जगताप डेअरीजवळील स्पॉट १८ मॉलमधील हल्दीराम दुकानात चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या डिलिव्हरी विंडोचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तिजोरी रोकडीसह चोरून नेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २६ सप्टेंबरला पहाटे दोन ते सकाळी नऊ या वेळेत झाली. तिजोरीत १८ हजार ३०० रुपयांची रोकड होती. तिजोरीची किंमत १० हजार रुपये धरून एकूण २८ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दुकानातील कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (२) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत.









