तक्रारीनुसार, ज्येष्ठ नागरिकाला फेसबुकवर चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेची एक जाहिरात दिसली. जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर एका टूर्स कंपनीच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने यात्रेची माहिती दिली.
त्याच्या सांगण्यावरून तक्रारदाराने ऑनलाइन पैसे भरले. त्यानंतर प्रत्येक प्रवाशाचा स्वतंत्र विमा काढावा लागेल, असे सांगून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यावर संशय आल्याने तक्रारदाराने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित व्यक्तीने फोन उचलला नाही.
त्यानंतर विमानाची तिकिटे रद्द करून रक्कम काढून घेण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून ऑनलाइन फसवणुकीचा तपास सुरू केला आहे.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर किंवा cybercrime.gov.in वर तातडीने तक्रार करता येते.









