निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्रात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षीच्या उत्सवात आमदार शंकर जगताप यांनी श्रीगणेशाची आरती करून दर्शन घेतले.
ज्ञान प्रबोधिनी ही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना अध्यापनासोबत भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि शास्त्रोक्त पूजेची ओळख करून देते, याबद्दल जगताप यांनी समाधान व्यक्त केले. केंद्राचे पदाधिकारी आणि भाविक या वेळी उपस्थित होते.
उत्सवात गणेशभक्तांनी सादर केलेल्या सांस्कृतिक नृत्याच्या कार्यक्रमात जगताप स्वतः सहभागी झाले आणि उत्स्फूर्त सादरीकरणाचा आनंद घेतला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता संस्कार, शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उत्सव आहे, असे सांगत त्यांनी ही परंपरा जपल्याबद्दल ज्ञान प्रबोधिनी परिवाराचे अभिनंदन केले.













