शहरात २० ते ३० मजल्यांच्या इमारतींची संख्या वेगाने वाढत असताना अग्निशमन दलाकडे त्या उंचीपर्यंत पोहोचणारी पुरेशी यंत्रणा आहे का, असा प्रश्न गणेशम फेज २ मधील आगीनंतर उपस्थित झाला. या पार्श्वभूमीवर काटे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले.

५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या अत्याधुनिक हायड्रॉलिक शिड्या आणि प्लॅटफॉर्म तातडीने अग्निशमन ताफ्यात समाविष्ट करावेत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच दलातील वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क आणि बचाव साहित्याचे सेफ्टी ऑडिट करून नादुरुस्त उपकरणे बदलावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

शहरातील किती सोसायट्यांचे फायर ऑडिट झाले, किती ठिकाणी त्रुटी आढळल्या आणि किती सोसायट्यांना नोटिसा बजावल्या, याचा अहवाल सात दिवसांत जाहीर करावा, अशी मागणीही निवेदनात आहे.

गणेशम फेज २ मधील घटना ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, असे काटे यांनी म्हटले आहे.