पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने १४ सप्टेंबरला काढलेल्या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर लाईट आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापराला बंदी आहे.

असे असताना आनंदनगरमधील एका अंतर्गत रस्त्यावर उच्च क्षमतेची ध्वनियंत्रणा वापरली जात असल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणी साऊंड सिस्टीमचा मालक, मॅनेजर आणि सुपरवायझर अशा तिघांविरोधात कारवाई करण्यात आली.

पोलिस शिपायाच्या फिर्यादीवरून २४ सप्टेंबरच्या रात्री चिंचवड पोलिस ठाण्यात सार्वजनिक शांततेच्या भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिघांना नोटीस बजावण्यात आली.

सहायक पोलिस निरीक्षक आणि महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.