कार्यशाळेत प्राचार्या ज्योतिका मलकानी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत मदत केली. विद्यार्थ्यांनी विविध आकार, रचना आणि सजावटीचा वापर करून आपल्या कल्पकतेला वाव दिला.
स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती घडवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला. त्याचबरोबर पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशोत्सव साजरा करणे का आवश्यक आहे, हेही त्यांना समजावून सांगण्यात आले.
गणेशोत्सव हा संस्कृती आणि परंपरेशी जोडलेला सण असला तरी तो साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे शाळेचे अध्यक्ष संदीप काटे म्हणाले. लहान वयात पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाल्यास ती पुढील आयुष्यात टिकते, असेही त्यांनी सांगितले.
अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेसोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून मिळतो, असे शाळेने म्हटले आहे.














