महापालिकेने महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, प्रभाग अध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींना शासकीय वाहने उपलब्ध करून दिली होती.
शासकीय वाहन वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वाहने प्रशासनाकडे जमा करून घेतली जात आहेत. खासगी वाहन वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी वाहनांवरील पक्षचिन्हे किंवा राजकीय फलक झाकावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका भवनातील पदाधिकाऱ्यांच्या दालनांवरील नावाच्या पाट्या, राजकीय व्यक्तींच्या प्रतिमा आणि पक्षचिन्हे झाकण्याचे कामही सुरू झाले आहे.
आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.














