विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे, असे मत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी या वेळी व्यक्त केले. चित्रकला आणि वक्तृत्वासारख्या उपक्रमांतून विद्यार्थी आपले विचार आणि स्वप्ने व्यक्त करतात, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून भारताच्या प्रगतीविषयीच्या कल्पना चित्रांतून साकारल्या, तर वक्तृत्व स्पर्धेत आत्मविश्वासाने आपले विचार मांडले, असे नगरसेविका अनिता काटे यांनी सांगितले.
वाढदिवसाचा कार्यक्रम केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम घेतल्याचे शाळेचे संस्थापक संदीप काटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला भाजपचे रहाटणी-पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, शाळेच्या प्राचार्या ज्योतिका मलकानी, विविध पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी स्पर्धेचे नियोजन केले.














