आगीची माहिती मिळताच परिसरातील नगरसेविका अनिता काटे यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले.

आगीदरम्यान सोसायटीत अडकलेल्या दोन लहान मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि इतर यंत्रणांच्या समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला.

चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आग लागण्यामागील कारणाचा तपास संबंधित विभाग करत आहेत.

निवासी इमारतींमधील अग्निसुरक्षा उपाययोजना नियमितपणे तपासल्या जाव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविका काटे यांनी केले.