आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये आयोजित महामोर्चात सहभागी होण्यासाठी आमदार अमित गोरखे रवाना झाले होते. नाशिकमध्ये त्यांच्या वाहनाची दुसऱ्या एका वाहनाशी धडक झाली.
वाहनात गोरखे यांच्यासोबत काही कार्यकर्ते, वाहनचालक आणि दोन अंगरक्षक होते. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघातात मानेला किरकोळ दुखापत झाली असून तातडीने प्राथमिक उपचार घेतल्याचे गोरखे यांनी स्वतः स्पष्ट केले. प्रकृती पूर्णपणे स्थिर असून चालक, सुरक्षारक्षक आणि इतर सहप्रवासीही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण लागू करावे, अशी भूमिका गोरखे सातत्याने मांडत आहेत. मोर्चाला जाताना अपघात झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.










